< Titovi 1 >
1 Pavel, služebník Boží, apoštol pak Ježíše Krista, podle víry vyvolených Božích a známosti pravdy, kteráž jest podle zbožnosti,
१देवाच्या निवडलेल्यांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तीनुसार असलेल्या सत्याच्या पूर्ण ज्ञानासाठी नेमलेला येशू ख्रिस्ताचा प्रेषित आणि देवाचा दास पौल, ह्याच्याकडूनः
2 K naději života věčného, kterýž zaslíbil před časy věků ten, jenž nikdy neklamá, Bůh, zjevil pak časy svými, (aiōnios )
२जे सर्वकाळचे जीवन ज्याला असत्य बोलवत नाही त्या देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले, (aiōnios )
3 Totiž to slovo své, skrze kázání mně svěřené, podle zřízení Spasitele našeho Boha, Titovi, vlastnímu synu u víře obecné:
३त्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तीदायक सत्याच्या ज्ञानासाठी, त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपवलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले.
4 Milost, milosrdenství a pokoj od Boha Otce a Pána Jezukrista Spasitele našeho.
४आपल्या सामाईक असलेल्या विश्वासाप्रमाणे माझे खरे लेकरू तीत यास; देवपित्यापासून व आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा, दया व शांती असो.
5 Z té příčiny zanechal jsem tebe v Krétě, abys to, čehož tam ještě potřebí, spravil a ustanovil po městech starší, jakož i já při tobě jsem zřídil:
५मी तुला क्रेत बेटावर ह्यासाठी ठेवून आलो की, तू पूर्ण न झालेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरांत वडील नेमावे.
6 Jest-li kdo bez úhony, jedné manželky muž, dítky maje věřící, na kteréž by nemohlo touženo býti, že by byli bujní, anebo nepoddaní.
६ज्याला नेमावयाचे तो निर्दोष असावा, एका स्त्रीचा पती असावा, त्याची मुले विश्वास ठेवणारी असून त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावी.
7 Neboť biskup má býti bez úhony, jako Boží šafář, ne svémyslný, ne hněvivý, ne pijan vína, ne bijce, ne žádostivý mrzkého zisku,
७अध्यक्ष हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असावा, तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका अनीतीने पैसे मिळविणारा नसावा;
8 Ale přívětivý k hostem, dobrotivý, opatrný, spravedlivý, svatý, zdrželivý,
८तर अतिथिप्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा; मर्यादशील, नीतिमान, पवित्र, संयमी,
9 Pilně se přídržící věrné řeči v učení Božím, aby mohl i napomínati učením zdravým, i ty, kteříž odpírají, přemáhati.
९आणि दिलेल्या शिक्षणाप्रमाणे जे विश्वसनीय वचन त्यास धरुन राहणारा असा असावा; यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व उलट बोलणाऱ्यास कुंठित करावयासही शक्तीमान व्हावे.
10 Neboť jsou mnozí nepoddaní, marnomluvní, i svůdcové myslí lidských, zvláště ti, jenž jsou z obřízky.
१०हे महत्त्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत. जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांस फसवितात. मी विशेषेकरून, जे सुंता झालेले आहेत त्यांना संबोधून बोलत आहे.
11 Jimž musejí ústa zacpána býti; kteříž celé domy převracejí, učíce neslušným věcem, pro mrzký zisk.
११त्यांची तोंडे बंद केली पाहिजेत; त्यांनी शिकवू नयेत त्या गोष्टी ते अयोग्य लाभासाठी शिकवतात आणि संपूर्ण घराची उलथापालथ करतात.
12 Řekl jeden z nich, vlastní jejich prorok, že Kretenští jsou vždycky lháři, zlá hovada, břicha lenivá.
१२त्यांच्यामधील एका संदेष्ट्याने म्हणले आहे की, ‘क्रेती लोक हे नेहमीच लबाड, पशुंसारखे खतरनाक, आळशी व खादाड आहेत.’
13 Svědectví to pravé jest. A protož tresciž je přísně, ať jsou zdraví u víře,
१३ही साक्ष खरी आहे. तर त्यांनी विश्वासात स्थिर व्हावे म्हणून तू त्यांचा निषेध कर.
14 Nešetříce Židovských básní, a přikázání lidí těch, jenž se odvracují od pravdy.
१४यासाठी की, त्यांनी यहूदी कहाण्यांकडे आणि सत्याकडून वळविणार्या, मनुष्यांच्या आज्ञांकडे लक्ष देऊ नये. विश्वासात खंबीर व्हावे.
15 Všecko zajisté čisté jest čistým, poskvrněným pak a nevěřícím nic není čistého, ale poskvrněná jest i mysl jejich i svědomí.
१५जे शुद्ध आहेत अशा लोकांस सर्व गोष्टी शुद्ध आहेत पण जे विटाळलेले आहेत आणि विश्वास ठेवत नाहीत अशांना काहीच शुद्ध नाही पण त्यांचे मन आणि विवेक हेही मलीन आहेत.
16 Vypravují o tom, že Boha znají, ale skutky svými toho zapírají, ohavní jsouce, a nepoddaní, a ke všelikému skutku dobrému nehodní.
१६ते लोक ‘आम्ही देवाला ओळखतो’ असे उघड सांगतात, पण ते कृतीत त्यास नाकारतात. ते अमंगळ व अवमान करणारे आणि कोणत्याही चांगल्या कामात कसोटीस न उतरलेले आढळतात.