< 1 Korinčanima 9 >
1 Nisam li ja slobodan? Nisam li apostol? Nisam li vidio Isusa, Gospodina našega? Niste li vi djelo moje u Gospodinu?
१मी स्वतंत्र नाही काय? मी प्रेषित नाही काय? मी आपल्या प्रभू येशूला पाहिले नाही काय? प्रभूच्या ठायी तुम्ही माझे काम आहात ना?
2 Ako drugima nisam apostol, vama svakako jesam. Ta vi ste pečat mojega apostolstva u Gospodinu.
२जरी मी इतरांकरता प्रेषित नसलो, तरी निःसंशय मी तुमच्याकरता आहे कारण तुम्ही प्रभूमध्ये माझ्या प्रेषितपणाचा शिक्का आहात.
3 Moj odgovor mojim tužiteljima jest ovo:
३माझी चौकशी करणार्यांना हे माझे प्रत्युत्तर आहे:
4 Zar nemamo prava jesti i piti?
४आम्हास खाण्यापिण्याचा अधिकार नाही काय?
5 Zar nemamo prava ženu vjernicu voditi sa sobom kao i drugi apostoli i braća Gospodnja i Kefa?
५इतर प्रेषित, प्रभूचे भाऊ किंवा केफा, हे करतात त्याप्रमाणे आम्हास कोणी विश्वासी बहीण पत्नी करून घेऊन, बरोबर नेण्याचा अधिकार नाही काय?
6 Ili samo ja i Barnaba nemamo prava ne raditi?
६किंवा केवळ मला आणि बर्णबाला काम न करण्याचा अधिकार नाही काय?
7 Tko ikada vojuje o svojem trošku? Tko sadi vinograd pa roda njegova ne jede? Ili tko pase stado pa od mlijeka stada ne jede?
७स्वतःच्या खर्चाने सैनिक म्हणून सेवा करणारा असा कोण आहे? कोण द्राक्षमळा लावतो आणि त्याचे फळ खात नाही? किंवा कोण कळप राखतो आणि कळपाच्या दुधातून पीत नाही?
8 Zar to govorim po ljudsku? Ne kaže li to i Zakon?
८मी या गोष्टी लोकरीतीस अनुसरून सांगतो काय? नियमशास्त्र हेच सांगत नाही काय?
9 Jer u Mojsijevu zakonu piše: Ne zavezuj usta volu koji vrši! Zar je Bogu do volova?
९कारण, मोशेच्या नियमशास्त्रात लिहिले आहे की, ‘मळणी करीत असलेल्या बैलाला मुसके घालू नको.’ देव केवळ बैलांची काळजी करतो काय?
10 Ne govori li on baš radi nas? Doista, radi nas je napisano, jer tko ore, u nadi treba da ore; i tko vrši, u nadi da će dobiti dio.
१०किंवा सर्वस्वी आपल्याकरता तो हे म्हणतो? हे निःसंशय आपल्याकरता लिहिले आहे म्हणजे जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे आणि जो मळणी करतो त्याने आपण वाटेकरी होऊ या आशेने करावी.
11 Ako smo mi vama sijali dobra duhovna, veliko li je nešto ako vam požanjemo tjelesna?
११आम्ही तुमच्यात जर आत्मिक गोष्टी पेरल्या आहेत, तर आम्ही तुमच्या दैहिक गोष्टींची कापणी केल्यास त्यामध्ये मोठे काय आहे?
12 Ako drugi sudjeluju u vašim dobrima, zašto ne bismo mi mogli još većma. Ali nismo se poslužili tim pravom, nego sve teglimo da ne bismo postavili kakvu zapreku evanđelju Kristovu?
१२जर दुसरे तुमच्यावरील या अधिकाराचे वाटेकरी होतात, तर आम्ही विशेषेकरून का होऊ नये? आणि तरी आम्ही या अधिकाराचा उपयोग केला नाही, पण ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला आम्ही अडखळण करू नये म्हणून, आम्ही सर्व गोष्टी सहन करतो.
13 Ne znate li: koji obavljaju svetinje, od svetišta se hrane; i koji žrtveniku služe, sa žrtvenikom dijele?
१३जे निवास्थानाचा भवनातील पवित्र वस्तूंची सेवा करतात ते भवनातील अन्न खातात आणि जे वेदीपुढे उभे राहतात ते वेदीचे भागीदार होतात, हे तुम्ही जाणत नाही काय?
14 Tako je i Gospodin onima koji evanđelje navješćuju odredio od evanđelja živjeti.
१४प्रभूने त्याचप्रमाणे आज्ञा दिली आहे की, जे शुभवर्तमानाची घोषणा करतात त्यांचा शुभवर्तमानावर निर्वाह व्हावा,
15 No ja se ničim od toga nisam poslužio. A i ne napisah toga da bi se tako postupilo prema meni. Radije umrijeti, nego... Te mi slave nitko neće oduzeti!
१५पण ह्यातील कोणत्याच गोष्टीचा मी कधी उपयोग केला नाही किंवा माझ्यासाठी तसे करावे म्हणून मी या गोष्टी लिहिल्या नाहीत कारण हे माझे अभिमान मिरवणे कोणी निरर्थक करण्यापेक्षा मला मरणे बरे वाटेल.
16 Jer što navješćujem evanđelje, nije mi na hvalu, ta dužnost mi je. Doista, jao meni ako evanđelja ne navješćujem.
१६कारण जरी मी शुभवर्तमान सांगतो, तरी अभिमान मिरवण्यास मला कारण नाही कारण मला हे करणे भाग आहे; मी शुभवर्तमान सांगणार नाही, तर मला हाय.
17 Jer ako to činim iz vlastite pobude, ide me plaća; ako li ne iz vlastite pobude - služba je to koja mi je povjerena.
१७कारण, मी हे स्वेच्छेने केले, तर मला वेतन मिळेल, पण माझ्या इच्छेविरुद्ध असेल, तर माझ्यावर हा कारभार सोपविला गेला आहे.
18 Koja mi je dakle plaća? Da propovijedajući pružam evanđelje besplatno ne služeći se svojim pravom u evanđelju.
१८तर मग माझे वेतन काय? एवढेच की, मी शुभवर्तमान सांगताना, ते फुकट सांगावे आणि शुभवर्तमानाविषयीच्या माझ्या अधिकाराचा मी दुरुपयोग करू नये.
19 Jer premda slobodan od sviju, sam sebe svima učinih slugom da ih što više steknem.
१९कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असलो तरी अधिक लोक मिळवावेत म्हणून मी सर्वाचा दास झालो.
20 Bijah Židovima Židov da Židove steknem; onima pod Zakonom, kao da sam pod Zakonom - premda ja nisam pod Zakonom - da one pod Zakonom steknem;
२०मी यहूद्यांना मिळविण्यास, यहूद्यांना यहुद्यांसारखा झालो; मी नियमशास्त्राधीन नसलो तरी मी नियमशास्त्राधीन असलेले मिळविण्यास, नियमशास्त्राधीन असल्यासारखा झालो.
21 onima bez Zakona, kao da sam bez zakona - premda nisam bez Božjega zakona, nego u Kristovu zakonu - da steknem one bez Zakona;
२१(मी देवाच्या नियमाबाहेर नाही, पण ख्रिस्ताच्या नियमाखाली असल्यामुळे) मी नियमशास्त्राधीन नसलेले मिळविण्यास, नियमशास्त्राधीन नसलेल्यांना नियमशास्त्राधीन नसल्यासारखा झालो.
22 bijah nejakima nejak da nejake steknem. Svima bijah sve da pošto-poto neke spasim.
२२आणि मी दुर्बळ असलेले मिळविण्यास, दुर्बळांना दुर्बळासारखा झालो. मी सर्वांना सर्व झालो आहे, म्हणजे सर्वकाही करून मी कित्येकांचे तारण करावे.
23 A sve činim poradi evanđelja da bih i ja bio suzajedničar u njemu.
२३आणि मी हे सर्वकाही शुभवर्तमानाकरीता करतो, म्हणजे मीही तिच्यात सहभागी व्हावे.
24 Ne znate li: trkači u trkalištu svi doduše trče, ali jedan prima nagradu? Tako trčite da dobijete.
२४शर्यतीत धावणारे सगळेच धावतात पण एकालाच बक्षीस मिळते, हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून असे धावा की, ते तुम्ही मिळवाल.
25 Svaki natjecatelj sve moguće izdržava; oni da dobiju raspadljiv vijenac, mi neraspadljiv.
२५स्पर्धेसाठी मेहनत करणारा प्रत्येक मनुष्य प्रत्येक गोष्टीत संयमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळविण्यासाठी करतात, पण आपण अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करतो.
26 Ja dakle tako trčim - ne kao besciljno, tako udaram šakom - ne kao da mlatim vjetar,
२६म्हणून तसा मी धावतो, निरर्थक नाही, मी तसे मुष्टिप्रहार करतो, हवेवर प्रहार करणार्यासारखे नाही.
27 nego krotim svoje tijelo i zarobljavam da sam ne budem isključen pošto sam drugima propovijedao.
२७पण मी माझे शरीर दाबाखाली दास्यात ठेवतो; नाही तर, दुसर्यांना घोषणा केल्यावर मी स्वतः, काही कारणाने, कसोटीस न उतरलेला होईन.