< 詩篇 116 >

1 我愛耶和華, 因為他聽了我的聲音和我的懇求。
मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी वाणी आणि माझ्या विनंत्या दयेसाठी ऐकतो.
2 他既向我側耳, 我一生要求告他。
कारण तो माझे ऐकतो, म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्यास हाक मारीन.
3 死亡的繩索纏繞我; 陰間的痛苦抓住我; 我遭遇患難愁苦。 (Sheol h7585)
मृत्यूचे दोर माझ्याभोवती आवळले, आणि मला अधोलोकांच्या यातना झाल्या, संकट व क्लेश मला झाले. (Sheol h7585)
4 那時,我便求告耶和華的名,說: 耶和華啊,求你救我的靈魂!
नंतर मी परमेश्वराच्या नावाचा धावा केला, “हे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो, मला वाचव.”
5 耶和華有恩惠,有公義; 我們的上帝以憐憫為懷。
परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे; आमचा देव कनवाळू आहे.
6 耶和華保護愚人; 我落到卑微的地步,他救了我。
परमेश्वर भोळ्यांचे रक्षण करतो; मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझे तारण केले.
7 我的心哪!你要仍歸安樂, 因為耶和華用厚恩待你。
हे माझ्या जिवा तू आपल्या विश्रामस्थानी परत ये; कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत.
8 主啊,你救我的命免了死亡, 救我的眼免了流淚, 救我的腳免了跌倒。
तू माझा जीव मृत्यूपासून, माझे डोळे अश्रूपासून, आणि माझे पाय अडखळण्यापासून मुक्त केले आहेत.
9 我要在耶和華面前行活人之路。
जीवंताच्या भूमित परमेश्वराची सेवा करणे मी चालूच ठेवीन.
10 我因信,所以如此說話; 我受了極大的困苦。
१०मी फार पीडित आहे असे जेव्हा मी म्हणालो, तरी माझा त्याच्यावर विश्वास आहे.
11 我曾急促地說: 人都是說謊的!
११मी अविचाराने म्हणालो की, सगळे माणसे खोटारडे आहेत.
12 我拿甚麼報答耶和華向我所賜的一切厚恩?
१२परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराची मी कशी परतफेड करू?
13 我要舉起救恩的杯, 稱揚耶和華的名。
१३मी तारणाचा प्याला उंचावून परमेश्वराच्या नावाने हाक मारीन.
14 我要在他眾民面前向耶和華還我的願。
१४त्याच्या सर्व लोकांसमोर, मी परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन.
15 在耶和華眼中, 看聖民之死極為寶貴。
१५परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचा मृत्यू अमोल आहे.
16 耶和華啊,我真是你的僕人; 我是你的僕人,是你婢女的兒子。 你已經解開我的綁索。
१६हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा सेवक आहे; मी तुझा सेवक, तुझी दासी असलेल्या स्त्रीचा मुलगा आहे; माझी बंधने तू सोडली आहेस.
17 我要以感謝為祭獻給你, 又要求告耶和華的名。
१७मी तुला उपकाराचा यज्ञ अर्पण करीन आणि मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.
18 我要在他眾民面前, 在耶和華殿的院內, 在耶路撒冷當中, 向耶和華還我的願。 你們要讚美耶和華!
१८मी त्याच्या सर्व लोकांसमोर परमेश्वरास केलेले नवस पूर्ण करीन.
१९परमेश्वराच्या घराच्या अंगणात, यरूशलेमा तुझ्यामध्ये ते फेडीन. परमेश्वराची स्तुती करा.

< 詩篇 116 >