< 约书亚记 19 >
1 为西缅支派的人,按着宗族,拈出第二阄。他们所得的地业是在犹大人地业中间。
१दुसऱ्या वेळेस शिमोनाच्या नावाची चिठ्ठी म्हणजे शिमोनाच्या वंशाची चिठ्ठी त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली; त्यांचे वतन तर यहूदाच्या वंशजाच्या वतनामध्ये त्यांना वतन मिळाले.
2 他们所得为业之地就是:别是巴(或名示巴)、摩拉大、
२आणि त्यांचे वतन म्हणून ही नगरे त्यांना मिळाली; बैर-शेबा म्हणजे शेबा व मोलादा;
३हसर-शुवाल व बाला व असेम;
४एल्तोलाद व बथूल व हर्मा;
५आणि सिकलाग व बेथ-मर्का-बोथ व हसर-सूसा;
6 伯·利巴勿、沙鲁险,共十三座城,还有属城的村庄;
६आणि बेथ-लबवोथ व शारुहेन; ही तेरा नगरे, आणि त्यांची गावे;
7 又有亚因、利门、以帖、亚珊,共四座城,还有属城的村庄;
७अईन, रिम्मोन व एथेर व आशान; अशी नगरे चार, आणि त्याकडले गावे;
8 并有这些城邑四围一切的村庄,直到巴拉·比珥,就是南地的拉玛。这是西缅支派按着宗族所得的地业。
८बालथ-बैर, म्हणजेच दक्षिण प्रदेशातील रामा येथपर्यंत या नगरांच्या चहुकडली सर्व गावे. शिमोनी वंशजांचा त्यांच्या कुळांप्रमाणे हाच वतन भाग होय.
9 西缅人的地业是从犹大人地业中得来的;因为犹大人的分过多,所以西缅人在他们的地业中得了地业。
९शिमोनाला यहूदी वंशजाच्या वतनातील प्रदेशातच वाटा देण्यात आला. कारण यहूदी वंशाचे वतन त्यांच्या संख्येच्या मानाने फार मोठे होते, म्हणून त्यांच्या वतनात शिमोनी वंशजाला वतन मिळाले.
10 为西布伦人,按着宗族,拈出第三阄。他们地业的境界是到撒立;
१०तिसरी चिठ्ठी जबुलून वंशजाची त्यांच्या कुळाप्रमाणे निघाली; आणि त्यांच्या वतनाची सीमा सारीदपर्यंत आहे;
11 往西上到玛拉拉,达到大巴设,又达到约念前的河;
११त्यांची सीमा पश्चिमेस, वर मरलापर्यंत जाऊन दब्बेशेथ येथे पोहचते आणि यकनामा समोरील ओहोळास जाऊन लागते.
12 又从撒立往东转向日出之地,到吉斯绿·他泊的境界,又通到大比拉,上到雅非亚;
१२ती सारीद येथून पूर्वेकडे सूर्याच्या उगवतीस वळून किसलोथ-ताबोर याच्या सीमेस लागते; तेथून दाबरथ येथे जाऊन याफीयपर्यंत वर जाते.
13 从那里往东,接连到迦特·希弗,至以特·加汛,通到临门,临门延到尼亚;
१३तेथून पूर्वे दिशेकडे गथ-हेफेर व इत्ता-कासीन येथवर जाते. आणि तेथून नेया जवळील रिम्मोन येथे निघते;
14 又绕过尼亚的北边,转到哈拿顿,通到伊弗他·伊勒谷。
१४ती सीमा त्यास वळसा घालून उत्तरेस हन्नाथोनपर्यंत जाते व तेथून इफताह-एल खोऱ्यात संपते.
15 还有加他、拿哈拉、伸 、以大拉、伯利恒,共十二座城,还有属城的村庄。
१५कट्टाथ, नहलाल व शिम्रोन, इदला, बेथलहेम आदिकरून बारा नगरे दिली, त्यामध्ये गावे मोजली नाहीत.
16 这些城并属城的村庄就是西布伦人按着宗族所得的地业。
१६जबुलून वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे, हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.
१७इस्साखाराच्या वंशजाची त्यांच्या कुळांप्रमाणे चौथी चिठ्ठी निघाली.
१८त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती; इज्रेल व कसुल्लोथ व शूनेम;
१९आणि हफराईम, शियोन व अनाहराथ;
२१रेमेथ व एन-गन्नीम, एन-हद्दा व बेथ-पसेस,
22 又达到他泊、沙哈洗玛、伯·示麦,直通到约旦河为止,共十六座城,还有属城的村庄。
२२त्याची सीमा ताबोर, शहसुमा व बेथ-शेमेश, येथवर जाते आणि त्यांच्या सीमेचा शेवट यार्देन येथे झाला; ही सोळा नगरे व त्यांची गावे.
23 这些城并属城的村庄就是以萨迦支派按着宗族所得的地业。
२३इस्साखाराच्या वंशाचे त्यांच्या कुळाप्रमाणे हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.
२४पाचवी चिठ्ठी आशेर वंशजांच्या नावाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.
२५त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती हेलकथ, हली, बटेन व अक्षाफ;
26 亚拉米勒、亚末、米沙勒;往西达到迦密,又到希曷·立纳,
२६अल्लामेलेख, अमाद व मिशाल, त्यांची सीमा पश्चिमेस कर्मेल व शिहोर-लिब्नाथ येथवर जाते;
27 转向日出之地,到伯·大衮,达到细步纶;往北到伊弗他·伊勒谷,到伯·以墨和尼业,也通到迦步勒的左边;
२७ती वळून सूर्याच्या उगवतीस बेथ-दागोन येथवर जाऊन उत्तरेस जबुलून वतनापर्यंत आणि इफताह-एल खोऱ्याच्या उत्तरेकडून व बेथ-एमेक नगर व नियेल नगर येथपर्यंत पोहचते, तशीच डावीकडे काबूल नगर येथे निघते.
28 又到义伯 、利合、哈们、加拿,直到西顿大城;
२८तेथून एब्रोन, रहोब व हम्मोन व काना यांवरून जाऊन मोठ्या सीदोन शहरापर्यंत पोहचते.
29 转到拉玛和坚固城泰尔;又转到何萨,靠近亚革悉一带地方,直通到海;
२९तेथून ती वळसा घेऊन रामापर्यंत जाते व तेथून सोर नामक तटबंदीच्या नगरापर्यंत जाते. तेथून ती होसा नगराकडे वळते आणि अकजीब प्रदेशातून जाऊन समुद्राला मिळते.
30 又有乌玛、亚弗、利合,共二十二座城,还有属城的村庄。
३०उम्मा, अफेक व रहोब, ही बावीस नगरे व त्यांची गावे त्यांना मिळाली;
31 这些城并属城的村庄就是亚设支派按着宗族所得的地业。
३१आशेराच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे, हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.
३२सहावी चिठ्ठी नफताली वंशजांच्या नांवाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.
33 他们的境界是从希利弗从撒拿音的橡树,从亚大米·尼吉和雅比聂,直到拉共,通到约旦河;
३३त्यांची सीमा हेलेफ नगर आणि साननीमातील एला वृक्ष यापासून अदामी-नेकेब शहर व यबनेल यावरुन लक्कुम येथे जाऊन यार्देनेपाशी निघते.
34 又转向西到亚斯纳·他泊,从那里通到户割,南边到西布伦,西边到亚设,又向日出之地,达到约旦河那里的犹大。
३४तेथून ती सीमा पश्चिमेस वळून अजनोथ ताबोर येथे जाते व तेथून हुक्कोक शहर येथे जाते; व तेथून दक्षिणेस जबुलूनाच्या वतन भागापर्यंत आणि पश्चिमेस आशेराच्या वतनापर्यंत उगवतीस यार्देनेपाशी यहूदाच्या वतनभागाला जाऊन मिळते.
35 坚固的城就是:西丁、侧耳、哈末、拉甲、基尼烈、
३५त्यातील तटबंदीची नगरे हे, सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ व किन्नेरेथ;
३७केदेश, एद्रई व एन-हासोर;
38 以利稳、密大·伊勒、和琏、伯·亚纳、伯·示麦,共十九座城,还有属城的村庄。
३८इरोन मिग्दल-एल, हरेम, बेथ-अनाथ व बेथ-शेमेश ही एकोणीस नगरे आणि त्यांची गावे.
39 这些城并属城的村庄就是拿弗他利支派按着宗族所得的地业。
३९नफतालीच्या वंशचे त्याच्या कुळांप्रमाणे हेच वतन, ही नगरे आणि त्यांची गावे.
४०सातवी चिठ्ठी दान वंशजाच्या नावाची त्याच्या कुळांप्रमाणे निघाली.
४१त्यांच्या वतन सीमेच्या आत ही नगरे होती; सरा, एष्टावोल, ईर-शेमेश.
४२शालब्बीन व अयालोन व इथला;
४४एलतके, गिब्बथोन व बालाथ;
४५यहूदा, बने-बराक व गथ-रिम्मोन.
४६मीयार्कोन व रक्कोन, याफोच्या समोरील प्रदेश.
47 但人的地界越过原得的地界;因为但人上去攻取利善,用刀击杀城中的人,得了那城,住在其中,以他们先祖但的名将利善改名为但。
४७दानाच्या वंशजाची सीमा त्यांच्या मूळ वतनाबाहेरही गेली, कारण की दान वंशजांनी लेशेम शहराशी लढून त्यास धरले; आणि तलवारीने त्यास मारल्यावर त्यांचा ताबा घेऊन त्यामध्ये वस्ती केली, आणि आपला पूर्वज दान याचे नाव त्यांनी लेशेम शहरास ठेवले.
48 这些城并属城的村庄就是但支派按着宗族所得的地业。
४८दानाच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे हेच वतन, ही नगरे आणि त्यांची गावे मिळाली ते हे.
49 以色列人按着境界分完了地业,就在他们中间将地给嫩的儿子约书亚为业,
४९इस्राएल लोकांनी देशाच्या सीमांप्रमाणे वतन करून घेण्याची समाप्ती केल्यावर नूनाचा पुत्र यहोशवा याला आपल्यांमध्ये वतन दिले.
50 是照耶和华的吩咐,将约书亚所求的城,就是以法莲山地的亭拿·西拉城,给了他。他就修那城,住在其中。
५०परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी एफ्राइम डोंगरावरचे तिम्नाथ-सेरह नगर, जे त्याने मागितले, मग तो ते नगर बांधून त्यामध्ये राहिला.
51 这就是祭司以利亚撒和嫩的儿子约书亚,并以色列各支派的族长,在示罗会幕门口,耶和华面前,拈阄所分的地业。这样,他们把地分完了。
५१एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएलाच्या वंशांतले वडील अधिकारी यांनी शिलोमध्ये दर्शनमंडपाच्या दारी परमेश्वरासमोर, चिठ्ठ्या टाकून जी वतने वाटून दिली ती ही; याप्रमाणे त्यांनी देश वाटून देण्याचे संपले.