< 約伯記 10 >
1 我實在厭惡我的生活,我要任意苦訴我的怨情,傾吐我心中的酸苦。
१माझ्या आत्म्याला जीवीताचा कंटाळा आला आहे, मी मुक्तपणे तक्रार करीन. माझा आत्मा कडूपणेतून बोलेन.
2 我要對天主說:不要定我的罪! 請告訴我:你為何與我作對﹖
२मी देवाला म्हणेन, मला उगाच दोष देऊ नकोस. तू मजशी विरोध का करतो ते मला सांग.
3 你對親手所造的,加以虐待和厭棄,卻顯揚惡人的計劃,為你豈有好處﹖
३मला कष्ट देण्यात तुला सुख वाटते का? तुझ्या निर्मिती विषयी तुलाच आस्था नसावी असे वाटते, की वाईट लोकांनी ज्या मसलती केल्या त्या बाबतीत तू समाधानी आहेस का?
४तुला मानवी डोळे आहेत का? लोकांस दिसते ते तुला दिसते का?
५तुझे दिवस मनुष्याच्या आयुष्याइतकेच थोडे आहे, किंवा तुझे वर्ष हे लोकांच्या वर्ष सारखे आहे.
६तू माझ्या चुका शोधत असतोस, माझी पापे धुंडाळीत असतोस.
7 其實你知道我並沒有罪過,也知道無人能拯救我脫離你的掌握。
७मी निष्पाप आहे हे तुला माहित आहे. आणि तुझ्या हातातून मला कोणीही वाचवू शकणार नाही.
8 你親手形成了我,創造了我;此後你又轉念想消滅我。
८तुझ्या हातांनी माझी निर्मिती केली, माझ्या शरीराला आकार दिला, आता तेच हात माझ्याभोवती आवळले जात आहेत आणि माझा नाश करीत आहेत.
9 求你記憶:你造我時就像摶泥,難道還使我歸於泥土﹖
९मी विनंती करतो, विचार कर जरा आठव तू मला मातीसारखे बनवलेस. आता तूच परत माझी मातीत मिळवणार आहेस का?
१०तू मला दुधासारखे ओतलेस आणि दही घुसळणाऱ्याप्रमाणे तू मला घुसळून काढले आहेस ना?
11 用皮和肉作我的衣服,用骨和筋把我全身聯絡起來﹖
११हाडे आणि स्नायू यांनी तू मला एकत्र बांधलेस. आणि तू मला कातडीचे व मांसाचे कपडे चढविलेस.
12 是你將我生命的恩惠賜給了我,細心照顧維持了我的氣息。
१२तू माझ्यात प्राण ओतलेस आणि माझ्याशी अंत्यत दयाळू राहिलास. तू माझी काळजी वाहिलीस आणि माझ्या जीवाचे रक्षण केलेस.
१३परंतु तू हे तुझ्या हृदयात लपवून ठेवलेस तू तुझ्या हृदयात याची गुप्तपणे आखणी केलीस हे मला माहित आहे. तुझ्या मनात हेच होते याची जाणीव मला आहे.
14 你監視我,看我是否犯罪;如果我有罪;你決不放過。
१४जर मी पाप करतो तेव्हा तू माझ्यावर नजर ठेवतोस कारण त्यामुळेच माझ्या पापाबद्दल तू मला शिक्षा करशील
15 我若有罪,我就有禍了! 我若有義,也不敢抬頭,因為我已備嘗凌辱,吃盡苦頭。
१५पाप केल्यावर मी अपराधी असेन आणि माझ्या दृष्टीने ते फारच वाईट असेल. परंतु मी निष्पाप असूनही माथा उंच करु शकत नाही. मला खूप लाज वाटते आणि मी गोंधळून जातो.
16 我若抬頭,你就像獅子追捕我,向我表現你的奇能,
१६मी जेव्हा यशस्वी होतो आणि मला गर्व चढू लागतो तेव्हा सिंह जशा टपून बसून शिकार करतो तशी तू माझी शिकार करतोस. तू तुझे सामर्थ्य पुन्हा माझ्याविरुध्द दाखवितोस.
१७माझी चूक सिध्द करण्यासाठी तू माझ्या विरूद्ध नवीन साक्षीदार आणतोस. आणि माझ्यावरचा तुझा राग अधिकच भडकेल, तू माझ्याविरुध्द सैन्याची आणखी कुमक पुन: पुन्हा आणशील.
18 你為何叫我出離母胎﹖不如我那時斷氣,無人見我,
१८तू मला जन्माला तरी का घातलेस? आणि मी कुणाच्या दृष्टीस पडण्याआधीच मरण पावलो असतो तर बरे झाले असते.
19 就好像從未有過我一樣,一出母胎即被送入墳墓。
१९मी जगलोच नसतो तर बरे झाले असते. माझ्या मातेच्या उदरातून मला सरळ थडग्यातच नेले असते तर किती चांगले झाले असते.
२०माझे आयुष्याचे दिवस थोडे नाहीत काय? म्हणून तू मला एकटे सोड.
२१जिथून मी परत येवू शकणार नाही तिथे, अंधार आणि मृत्यूच्या जागी जाण्यापूर्वी जो काही थोडा वेळ माझ्यासाठी उरला आहे त्यामध्ये मला थोडी विश्रांती मिळेल.
२२जेथे काळोख, निबीड अंधार आहे, अशा मृत्युछायेच्या प्रदेशात मी सांगण्याविणा जाईल, जेथे प्रकाश हा मध्यरात्रीसारखा आहे.